कळीचं फुलणं हा तर तिचाच गुणवेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खूणपाखराचे बोल कुणासाठी गाणेकुणा येई धुंदी, कुणा येई तराणेकधी गुलाबी थंडी कधी वारा कुंदकुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद
"
"
भेट जाहली पहिली तेव्हा
सांज पेटली होती
रिमझिम वर्षेतूनि लालसा
लाल दाटली होती
काळ लोटला आज भेटता
नदी आटली होती
ओठांवरती उपचारांची
सभा थाटली होती
"
"
तुझ्या कवेत मला
माझे आयुष्य सारे काढायचे आहे
तुझ्या प्रेमाच्या पावसात मला चिंब भिजायचे आहे
तू आहेस म्हणून आहे आयुष्याला माझा अर्थ
तुझ्या नसण्याने सगळाच होईल अनर्थ
"
"
तुझ्या कुकंवाशी
माझं नात जन्मोजन्मी असावं
मंगळसूत्र गळ्यात घालताना
तू डोळ्यात पाहून हसावं
कितीही संकटे आली तरी
तुझा हात माझ्या हाती असावा
आणि मृत्यूलाही जवळ करताना
देह तुझ्या मिठीत असावा
"
"
सखे
हातात हात घेशील तेव्हा
भिती तुला कशाचीचच नसेल
अंधारातील काजवा तेव्हा
सूर्यापेक्षा प्रखर दिसेल
सहवासात तुझ्या
आयुष्य म्हणजे
नभात फुललेली
चांदणरात असेल
"
"
तुझ्या आठवणी म्हणजे
मोरपिसाचा हळुवार स्पर्श
तुझ्या आठवणी म्हणजे
नकळत निर्माण होणारा हर्ष
तुझ्या आठवणी म्हणजे
स्वप्नांनी सजवलेलं एक गाव
तुझ्या आठवणी म्हणजे
विरह सागरात हरवलेली नाव
"
"
तुझ्यासोबत जोडली मी माझ्या आयुष्याची दोरी
आता तुझ्याचसोबत पूर्ण होईल आयुष्याची शिदोरी
नजर न लागो तुझ्या माझ्या जोडीला
कारण माझ्यासाठी केवळ तुच माझा आधार आणि सखा
"
"
हजारो नाते असतील पण त्याहजार नात्यातएक नाते असे असतेजे हजार नाते विरोधात असतानासुद्धासोबत असतो तो म्हणजे नवरा