उपमाएकदा तुम्ही मला
छान दिसतेस
म्हणालांत पण
'समोरच्या सरोजबाईसारखी'
ते शब्द जोडून....
“
सुटकाबहात्तर कादबं-या लिहिणारी
माझी थोर साहित्यिक आत्या दम्याने
पंच्याहत्तराव्या वर्षी वारली
तेव्हा 'सुटली'
म्हणायच्याऎवजी तुम्ही 'सुटलो' म्हणालात....
“
हल्लीहल्ली पुर्वीसारखे माझाचेहरा टवटवीत दाखवणारे
आरसे मिळेनासे झाले आहेत
“
लक्षणमी केलेला केक
पण 'बकुळाबाईंनी पाठवला'
म्हटल्यावर, 'बेकार आहे' म्हणत
अख्खा मटकवलात
तेव्हाच मी तुमचं लक्षण
ओळखलं.
“
पक्षनिष्ठापंचवीस मार्क कमी पडून नापास
झालेले चिरंजीव तिर्थरूपांना म्हणाले,
'मी पहिल्यापासूनच मार्क्सविरोधी गटात आहे.'
“
प्रश्नआताशा बुडणा-या सुर्याला
'बराय उद्या भेटू'
असे म्हणाला की तो मला म्हणतो,
'कशावरून?
मधल्या रात्रीची
तुला अजूनही इतकी खात्री आहे?
'सुर्य आता म्हातारा झालाय.'