+२३ आई आणि बाबा साठी खास कविता, सुविचार | Aai Baba Kavita, quotes in marathi

आई बाबा या दोन शब्दांत जणू आपल सार विश्व सामावल आहे. आई म्हणजे ती जीने आपल्याला जन्म दिले, हे सुंदर जग दाखवल व बाबा म्हणजे ते जे दिवस रात्र कष्ट घेतात आपल्याला मोठे करण्यासाठी आपले जीवन सुंदर बनवण्यासाठी

अस म्हणतात की आई ही दिव्याची ज्योत असते आणि त्याचा प्रकाश परिवाराला मिळवा म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा असतात ते आपले बाबा. आपण लहान पणापासून मोठे होई पर्यंत आपल्यासाठी कष्ट घेतात व आपल्या साऱ्या गरजा पुरवतात ते आपले आई बाबा.

आपल्याला योग्य वळण लागाव म्हणून आपल्यावर त्यांचे नेहमीच बारीक लक्ष असते. आई बाबच प्रेम हे निस्वार्थ असते. आपण कितीही मोठे झालो तरीही त्यांच्यासाठी आपण लहानच असतो.

आपण यशस्वी व्हाव हेच त्यांच स्वप्न असत. तेच आपल्यावर संस्कार घडवितात व जीवनात योग्य मार्गदर्शन देत असतात. अश्याच आई वडिलांसाठी आज आम्ही काही कविता घेऊन आलोय ज्या तुम्हाला जरूर आवडतील. या साऱ्या कविता विविध लेखकांनी लिहल्या आहेत. या पैकी कोणती व कोणाची कविता तुम्हाला आवडली ते नक्की कळवा.

Table of Contents

  आई-बाबा वर कविता

  माझे सर्वस्व आहात तुम्ही..

  अस्तित्व माझे आहे तुमच्यामुळे..

  आयुष्य नावाच्या पुस्तकातील

  सोनेरी अध्याय आहात तुम्ही..

  सर्व सुखांचा झरा तुम्हापासून..

  नवचैतन्य, नव उमेदीचा

  उगम तुम्हापासून..

  अस्तित्व दिसते देवाचे

  तुमच्या मध्ये..

  फक्त असावे तुम्ही सोबत

  बाकी काही नको आयुष्यात ..

  -Adiya Zinage

  अधिक : 200+ Poems On Mother in Marathi | आई वर सुंदर चारोळी/कविता & शायरी 2022

  आई कुठे काय करते

  नऊ महिने पोटात सांभाळते

  बोट धरून चालायला शिकवते

  चालता चालता पडता उचलून घेते

  आई कुठे काय करते

  शाळेची पायरी चढायला लावते

  शिक्षणाचे महत्व समजावते

  जीवनात प्रथम गुरू होते

  आई कुठे काय करते

  कठीण प्रसंगी पाठीशी असते

  चुकता पाऊल समज देते

  मुलांच्या दुःखाने हळहळते

  आई कुठे काय करते

  प्रत्येक मार्गावर मार्गदर्शक असते

  मुलांच्या भल्यासाठी धडपडते

  मुलांच्या सुखात सुखावते

  आई कुठे काय करते

  मुलांसाठी सर्व स्वाहा करते

  अपराध पोटात घालून माफ करते

  लेकरांसाठी देह झिजवते

  आई कुठे काय करते

  श्री सुरेश शिर्के

  खारघर,पनवेल

  आई नाम जपा..

  हृदयी आईचे । माझ्या आहे स्थान ।

  तिने जीवदान । मज दिले ।।

  तिच्या ममतेला । जगी नाही तोड ।

  नाम किती गोड । आहे तिचे ।।

  जन्मां पुन्हा पुन्हा । यावेसे वाटते ।

  व्हावेसे वाटते । तान्हा बाळ ।।

  बोट पकडून । तिचे चालायचे ।

  मज निजायचे । कुशीमध्ये ।।

  नको वाटे जिवा । आईविना काही ।

  मज कशाचाही । मोह नाही ।।

  आई असताना । गरीब म्हणावे ।

  कशाला रडावे । पैशासाठी? ।।

  आई एकवेळ । उपाशी झोपेल ।

  घास भरवेल । लेकरांना ।।

  आई नाम जपा । काळ टळणार ।

  सुख मिळणार । क्षणोक्षणी ।।

  अजु आहे भक्त । माय माऊलीचा ।

  बाळ आहे तिचा । लडिवाळ  ।।

  ©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी

  ता.दारव्हा, जि.यवतमाळ

  भाव ठेवा मनी..…

  देवालयी नाही । वृद्धाश्रमी जावे ।

  घरात आणावे । आईबाप ।।

  त्यांनाच मानावे । ईश्वर स्वरूप ।

  प्रेम करा खूप । त्यांच्यावर ।।

  भाव ठेवा मनी । पालकांविषयी ।

  होण्यास विजयी । आयुष्यात ।।

  त्यांना रडवतो । तोचि खरा दुष्ट ।

  आनंद संपुष्ट । होई त्यांचे ।।

  नको दीप, धूप । नको फुलमाळ ।

  घालविण्या काळ । त्यांना जपा ।।

  अनंत पुण्याचे । धनी तुम्ही व्हाल ।

  सुख जर द्याल । मायबापा ।।

  आरोग्याची निगा । त्यांची घेतल्यास ।

  सौख्य आपणास । मिळणार ।।

  दुष्टांना ईश्वर । पावणार नाही ।

  केले जरी काही । त्यांच्यासाठी ।।

  दावू माणुसकी । माणूस बनून ।

  धर्मास पाळून । अजु म्हणे ।।

  ©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी

  ता.दारव्हा, जि.यवतमाळ

  डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी,

  डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ति दोस्ती,

  डोळे वटारुण प्रेम करते ति पत्नी,

  आणि डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ति फक्त

  आई……♥♥♥

  पूर्वजन्माची पुण्याई असावी

  जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,

  जग पाहिलं नव्हतं तरी

  नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!

  यशाच्या आकाशात गरूड होऊन

  जेव्हा आपण भरारी मारत असू.

  पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग

   विसरून पहात असतील.

  ते दोन डोळे म्हणजे आपले

   आई-वडील. .

  खिशातल्या

  हजार रुपयांची किंमत

  सुद्धा

  लहानपणी आईने

  गोळ्या खाण्यासाठी

  दिलेल्या

  एक रुपयापेक्षा

  कमीच असते..

  सोसताना वेदना मुखातून

  एक शब्द नेहमी येई प्रेमाचा

  पाझर पसरून त्या वेदनेवर

  वेदना नाहिशी करते आई…

  आई बद्दल लिहिता लिहिता
  शब्द अपुरे का पडतात?
  आणि बाबांबद्दल लिहायला घेतल्या
  वर डोळ्यातून अश्रु का येतात?
  या प्रश्नांची उत्तरे शोधायला या लेखिकेच
  अख्ख आयुष्य निघून जाणार आहे..

  -आदिती शिंदे

  आई वर कविता

  आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,
  आई म्हणजे साठा सुखाचा..
  आई म्हणजे मैत्रीण गोड,
  आई म्हणजे मायेची ओढ..
  आई म्हणजे प्रेमाची बाहूली,
  आई म्हणजे दयेची सावली..
  आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,
  आपल्याला भरवणारी..
  आई म्हणजे जीवाचं रान करून,
  आपल्यासाठी राबणारी..
  आई म्हणजे जगण्याचा अर्थ
  शिकवणारी,
  जे कधी ओरडून समजावणारी..
  आईचं बोट धरून,
  चालायला शिकवणारी..
  आईचं आपले,
  अस्तित्व घडवणारी.

  आई असते एक फुलाची कळी 
  सतत उमलत राहून सतत सुगंध दरवळत ठेवणारी
  आई असते क्षमेची मूर्ती, 
  आपल्या मुलांचे अनेक अपराध पोटात घालणारी
  आई असते एक सावली
  सतत सोबत राहून मार्ग दाखवणारी
  आई असते परोपकारी
  स्वतःसाठी न जगता इतरांसाठीच जगत राहणारी
  – प्रियांका पाटील 

  आई, हजार जन्म घेतले तरी
  एका जन्माचे ऋण फीटणार नाही
  आई, लाख चुका होतील मज कडून
  तुझं समजावनं मिटणार नाही
  – Smita Haldankar

  आई बद्दल अजून अश्याच कविता पहा 21+ आई वर सुंदर कविता आणि चारोळ्या In मराठी

  आई-बाबा वर सुविचारQuotes

   देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.

  आईने बनवल, बाबानी घडवल, आईने शब्दांची ओळखकरुन दिली बाबानी शब्दांचा अर्थ समजवला. आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले, आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली आईने लढण्यासठी शक्ती दिली बाबानी जिकण्यासाठी नीती दिली त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे

   आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात पैसा आणि नाव कितीही कमवलतं तरीही आई वडील गुरू यांच्या आशीर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असतं.

   आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा…. पण, कोणत्याही गोष्टीसाठी, आई-वडिलांना सोडू नका….

   आयुष्यात काही नसले तरी चालेल पण आई-वडिलांचा हात नेहमी पाठीशी असावा

  Leave a Comment